आपल्या अष्टपैलू बुद्धिमत्तेने महाराष्ट्रातील संगीत, रंगभूमी, चित्रपटसृष्टी, नाट्यलेखन, संगीत समीक्षा तसेच नवनवीन स्वररचना इत्यादी क्ष्रेत्रात आपली कर्तृत्त्वमुद्रा उमटविणाऱ्या कै. पं. गोविंदराव टेंबे यांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाचा सांगीतिक परिचय करून देणारा हा कार्यक्रम. या कार्यक्रमात गोविंदरावांच्या संगीताच्या अनेक पैलूंना स्पर्श करणारे संशोधक मन तसेच संगीताचा अभ्यास, रसास्वाद व आनंद निर्मिती यातच रमणारे व्यक्तिमत्त्व किती समृध्द होते, त्यांच्या पाऊलखुणांचा मागोवा घेतला जाईल.