बहुरूपी भारुड
|
समृध्द लोककलांचा वारसा ह्या महाराष्ट्रास लाभला आहे. मनोरंजनातून 'प्रबोधन' घडविणारी एक प्रभावी लोककला म्हणून भारुडांकडे पहावे लागेल. परंतु भारूडातील रुपकाकडे फारसे लक्ष न दिल्यामुळे भारुडे केवळ मनोरंजनाचा एक भाग म्हणून सादर होऊ लागली.
भारूडांचे निरुपण, रुपकांचे सादरीकरण आणि लोक भूमिका व त्यांचे स्वरूप ह्याचे विवेचन करीत नृत्य, नाट्य, संवाद, संगीत यांसह पारंपारिक वाद्यांच्या गजरात आणि कसलेल्या कलाकारांच्या संचात सादर होणारा बहुरूपी भारूडांचा हा एक रूपकात्मक आगळावेगळा अविष्कार.
डॉ. रामचंद्र देखणे हे भारूडांचे संशोधक असून संत साहित्य व लोक साहित्याचे व्यासंगी अभ्यासक आहेत. भारुड वाङमयातील तत्त्वज्ञान - संत एकनाथांच्या संदर्भात या त्यांच्या प्रबंधास पुणे विद्यापीठाची पी.एच. डी. पदवी प्राप्त झाली आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर शास्त्रशुध्द भारूडांचे हजारो कार्यक्रम करून त्यांनी या पारंपारिक लोककलेची जपणूक केली आहे व भारुडांना पुन्हा लोकप्रियता मिळवून दिली आहे.
सादर होणारी भारुडे
# पारंपारिक दिंडी - वाटचाल |
# फुगडी |
# जात्यावरची ओवी |
# वासुदेव |
# भुत्या |
# जोगवा |
# पसायदान |
|
सोबत चौघडा , संबळ , मृदुंग , वीणा , शिंग , या पारंपारिक वाद्यांसह
Photos